सागर प्रकाशनचे साजवार्ता
Page No.: 6 Date: 22/10/2026
ठेकेदारांच्या मालमत्ता शोधून मनपा बोजा चढवणार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मनपातील कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या तीन प्रमुख ठेकेदारांना २२ कोटी रुपये जास्तीचे अदा केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी थकीत रकमेच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, संबंधित ठेकेदारांच्या
मालमत्तांचा शोध घेऊन त्यावर थेट महापालिकेचा बोजा चढवला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने भूमी अभिलेख कार्यालयाला अधिकृत पत्र लिहून ठेकेदारांच्या सर्व मालमत्तांची सविस्तर माहिती मागवल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी बुधवारी (दि.२१) दिली.
महाराणा
एजन्सी,
अशोका एजन्सी आणि गॅलेक्सी एजन्सीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला जात होता. तीन एजन्सीला अतिरिक्त रक्कम देण्यात आल्याचा प्रकार लेखा परीक्षणातून समोर आला होता. तब्बल २० कोटी रुपये एकट्या महाराणा एजन्सीला गेल्याचे समोर आले. महापालिकेत कोणत्याही बिलाची फाइल
मंजूर होताना अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, लेखा विभाग, कामगार अधिकारी आणि लिपिकांसह आठ टेबलावरून फिरते. असे असताना प्रत्येक महिन्याच्या वेतनासाठी ही जास्तीची रक्कम कशी दिली गेली? असा प्रश्न महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसेच स्थायी समितीची बैठकीत नगरसेवकांनी केला होता.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















